---Advertisement---

लहुजी उस्ताद चौकात मटका जुगारावर पोलिसांची धडक कारवाई!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील मंदिर मार्केट परिसरात अवैध धंद्यांविरोधात शेगांव शहर पोलीस स्टेशन यांनी धडक कारवाई करत मटका जुगार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दि. ९ एप्रिल २०२६ रोजी, लहुजी उस्ताद चौक परिसरात श्रीकृष्ण नारायण गवई (वय २२, रा. रोकडिया नगर, शेगाव) हा पानटपरीजवळ वरळी मटका जुगाराचे अंक लिहित असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल गजानन शंकर दाबेराव यांनी दिली.या माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे यांनी दुपारी १:४५ वाजता छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले.कारवाईदरम्यान आरोपीकडून खालील साहित्य जप्त करण्यात आले: ₹५७०/- नगदी, वरळी मटका अंक लिहिलेली चिठ्ठी, एक डॉट पेन असे एकूण जप्त माल: ₹५७५/-

या प्रकरणी शेगांव शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment