---Advertisement---

अवैध दारू विक्री करणारा इसम रंगेहात पकडला; पोलिसांची कारवाई!!

---Advertisement---

शेगांव | (डी ललित) :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर दारू विक्रीवर बंदी असताना पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सईबाई मोटे उपसामान्य रुग्णालयासमोरील उड्डाण पुलाखाली एक इसम बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन सोनटक्के यांनी पंचांसमक्ष प्रोव्ही रेड टाकली.

या कारवाईदरम्यान शेख सलीम शेख अब्बास (वय ४२, रा. मोहम्मद अली चौक, शेगांव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारू ‘टँगो पंच’च्या १६ शिश्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येकी ४० रुपयांप्रमाणे एकूण ६४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी स.पो.नि. गजानन सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास घट्टे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment