---Advertisement---

शेगाव येथे चोरीची अंगठी शोधून तक्रारदारास परत!!

---Advertisement---

शेगाव :(डी ललित): येथील व्यंकटेश नगर परिसरातील रहिवासी रामचंद्र अर्जुन काळे यांच्या दहा ग्रॅम सोन्याच्या अंगठी चोरीप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून अंगठी शोधून तक्रारदारास परत दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र काळे यांनी त्यांच्या सोन्याच्या अंगठी चोरीस गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व शहानिशा केली. या कारवाईत पोलीस कर्मचारी योगेश जाधव, अंकुश गोरे आणि धनंजय पहुरकर यांनी सहभाग घेतला.

तपासादरम्यान अंगठी चोरणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना सदर अंगठी घटनास्थळावरच आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी अंगठी ताब्यात घेऊन ती तक्रारदार रामचंद्र काळे यांना परत दिली.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment