---Advertisement---

शेगावमध्ये शेजारी वादातून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील धनगर फेल परिसरात शेजारी वादातून मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी गणेश गोरखनाथ देवकते (वय 39, व्यवसाय चालक) हे मूळ शेगाव येथील रहिवासी असून सध्या अंबरनाथ (जि. ठाणे) येथे वास्तव्यास आहेत. आरोपी विकी कैलास करे, उमा विकी करे आणि कुंदाबाई कैलास करे हे सर्व धनगर फेल, शेगाव येथील रहिवासी आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता फिर्यादी यांच्या घरी जागेच्या वादातून आरोपी आणि फिर्यादीच्या आई-वडिलांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ केल्याने फिर्यादी यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विटेचा तुकडा डाव्या डोळ्याखाली फेकून मारल्याने फिर्यादी जखमी झाले. या घटनेत त्यांच्या डोळ्याजवळ जखम होऊन रक्तस्राव झाला.याशिवाय आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment