---Advertisement---

उत्कृष्ट सेवेसाठी उदय डांबे यांचा गौरव!!

---Advertisement---

धरणगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासन अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालय, धरणगाव येथे सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल मा. उदय डांबे यांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांना दर्जेदार व तत्पर सेवा पुरविण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. उदय डांबे हे विद्युत निरीक्षक, ऊर्जा विभाग, जळगाव येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकाभिमुख सेवा देत प्रशासनाची प्रतिमा उंचावली आहे.

या प्रसंगी त्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

सदर सन्मानपत्रावर उपजिल्हाधिकारी जळगाव डॉ. श्रीमत हाकर यांची स्वाक्षरी असून आज दि. २८ एप्रिल २०२६ रोजी हा सन्मान प्रदान करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment