---Advertisement---

शेगावमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृतसेवा): शहरातील जुनी सेंट्रल बँक परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दि. 29 एप्रिल 2026 सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख बुडन उर्फ मिथुन शेख फत्तु (रा. खळवाडी, शेगाव) हे सकाळी सुमारे 11 वाजण्यापूर्वी श्री टॉकीज चौक परिसरातून जात असताना जुनी सेंट्रल बँक समोरील मन लेक्स परिसरात गर्दी दिसली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अंदाजे 35 ते 40 वयोगटातील एक अनोळखी पुरुष चित्त अवस्थेत पडलेला आढळला.

याबाबत त्यांनी तत्काळ शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन संबंधित व्यक्तीस तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्या व्यक्तीस मृत घोषित केले.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अन्वये कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश भामोडकर करीत आहेत.

दरम्यान, मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्तीच्या अंगावर “ॐ दुर्गा” असे गोंदलेले असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची ओळख माहीत असल्यास किंवा नातेवाईकांनी पुढे येऊन शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment