---Advertisement---

पिंप्री काथरगाव ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा!!

---Advertisement---

पिंप्री काथरगाव (आकाश बोरसे) : १ मे रोजी महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस निमित्त पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांच्या पुढाकाराने विशेष उपक्रम राबविण्यात आला. ध्वजारोहणाचा मान गावातील शेतात दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या महिला कामगार प्रमिलाबाई संतोष मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक संदेश मिळाला.

कामगार दिनाचे औचित्य साधून गावातील विविध कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घरातील प्लास्टिक संकलन मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा लेटर बुक व पेन देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश सुलताने, शिक्षक वृंद, उपसरपंच डाखोडे ताई, ग्रामपंचायत सदस्य विलास कंकाळ, संजय मुंडे, प्रियाताई गोल्हर, कडू भाऊ कांबळे, रोजगार सेवक देविदास मेहंगे, शिपाई रमेश हातेकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने सामाजिक एकात्मता आणि कामगारांप्रती आदर व्यक्त केला. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment