बुलढाणा (आकाश बोरसे): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. सिनेस्टाईल पाठलाग करत ५ अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ₹४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पूर्णतः हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक १ मे २०२६ रोजी, फिर्यादी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (रा. शंकरनगर, नांदेड) यांना आरोपींनी ‘रत्न व सुलेमानी हकीक’ खरेदीच्या बहाण्याने चिखली येथे बोलावले.फिर्यादी राजवाडा परिसर, चिखली येथे आल्यानंतर आरोपी निलेश नरेश भोसले व त्याच्या इतर साथीदारांनी संगनमताने त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी व काठीने हल्ला केला.
या घटनेत आरोपींनी फिर्यादीकडील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण ₹४.८९ लाखांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला.या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी विशेष पथकाची स्थापना केली.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून आरोपी जालना जिल्ह्याकडे पळून जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सीमारेषेवर नाकाबंदी केली.आरोपींनी पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तब्बल ३ किलोमीटर शेतात धाव घेत पाठलाग करत सर्व आरोपींना पकडले.
👮 अटक आरोपी:
- निलेश नरेश भोसले (रा. साकेगाव)
- जंकीचंद विरोधभाई पवार (रा. साकेगाव)
- आदित्य शेनु भोसले (रा. साकेगाव)
- राजाअभिमान पवार (रा. साकेगाव)
- भाऊराजा पवार (रा. साकेगाव)
💰 जप्त मुद्देमाल:
- 2 सोन्याच्या अंगठ्या (14 ग्रॅम)
- सोन्याचे कुंडल (5 ग्रॅम)
- 400 ग्रॅम चांदीचे कडे
- 2 चांदीचे ब्रासलेट, अंगठी, साखळी व इतर वस्तू
- रोख रक्कम – ₹11,000
👉 एकूण ₹4,80,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🏅 कारवाईतील अधिकारी:
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. (युवा क्रांती वृत्तसेवा)








