बारामती (युवा क्रांती वृतसेवा) : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे.
रोहित पवार यांनी विश्वास व्यक्त करत म्हटले की, सुनेत्रा पवार यांना तब्बल 97 टक्के मते मिळतील, आणि त्या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. या वक्तव्यामुळे बारामतीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बारामती ही राज्यातील अत्यंत महत्त्वाची राजकीय मतदारसंघ मानली जाते. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांच्या या विधानामुळे विरोधकांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, आगामी काळात निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर प्रचार जोरात सुरू असून, विविध पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या बाजूने जनसमर्थन वाढत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.








