---Advertisement---

शेगाव नगर परिषद शाळांतील शिक्षक भरतीसाठी नगरसेवक नदीम पटेल यांचे निवेदन!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि रिक्त शिक्षक पदांमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नगरसेवक नदीम पटेल यांनी शेगाव नगर परिषद मुख्याधिकारी मॅडम यांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती संदर्भात निवेदन सादर केले.

महाराष्ट्र शासनामार्फत पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दि. 31 मेपर्यंत शाळांची माहिती तसेच रिक्त पदांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर नगर परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

नगरसेवक नदीम पटेल यांनी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षकांची कमतरता दूर झाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

📖 “विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आणि दर्जेदार शिक्षणासाठी सदैव प्रयत्नशील.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment