---Advertisement---

शेगावात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : अवैध गौण खनिज रेती (वाळू) वाहतूक करणाऱ्या टाटा 407 टिपरवर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाने धडक कारवाई करत 15 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दि. 7 मे 2026 रोजी अकोट रोडवरील श्री संत गजानन महाराज संस्थान हत्तीखाना परिसरात करण्यात आली.

पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता सह कलम 21 (1), 21 (2) गौण खनिज अधिनियम 1957 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सरतर्फे पोहेकॉ राजेंद्र टेकाळे. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोट रोड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एका संशयित टाटा 407 टिपरला थांबवून चौकशी केली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एक ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना अथवा रॉयल्टी नसल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी आरोपी देवानंद सुभाष मिसाळ (वय 22, रा. लोहारा ता. बाळापूर जि. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान MH-28 BB-2891 क्रमांकाचा टाटा 407 टिपर किंमत अंदाजे 15 लाख रुपये व एक ब्रास रेती किंमत 5 हजार रुपये असा एकूण 15 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका वाकेकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment