---Advertisement---

पुन्हा एकदा सातपुडाच! भक्ती ढोकने संग्रामपूर तालुक्यात प्रथम; सातपुडा इंग्लिश मेडियम स्कूलचा सलग ८ व्या वर्षी 100% निकाल!!

---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे ) : सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव (जा.) संचालित सातपुडा इंग्लिश मेडियम स्कूल, वरवट-बकाल यांनी यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे संग्रामपूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी शाळेतील एकूण ५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर उर्वरित ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा सर्वाधिक विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

भक्ती ढोकने तालुक्यात प्रथम

शाळेची विद्यार्थिनी कु. भक्ती गणेश ढोकने हिने ९७.६० टक्के गुण मिळवत संग्रामपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गुणवंत विद्यार्थी

  • प्रथम क्रमांक: कु. भक्ती गणेश ढोकने — 97.60%
  • द्वितीय क्रमांक: कु. कल्याणी सचिन ठाकरे — 97.20%
  • तृतीय क्रमांक: संकेत विलास ढगे — 96.60%

यावर्षी २५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. तसेच १३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये नियमित ई-लर्निंग शिक्षण, विषयानुसार सेमिनार तसेच नियमित सराव परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी संस्थेचे व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. श्री. कृष्णराव इंगळे, कोषाध्यक्ष डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, सीईओ श्री. नितीन सातव, कार्याध्यक्ष डॉ. संदीप वाकेकर तसेच शिक्षकवृंद यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment