---Advertisement---

कालखेड येथील १५ वर्षीय मुलगी ८ तासांत शोधली; शेगाव ग्रामीण पोलिसांची तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने यशस्वी कारवाई!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील कालखेड येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलीचा शेगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ८ तासांत शोध लावत तिला सुरक्षितरित्या पालकांच्या ताब्यात दिले. तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत कलम 137 (2) BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी प्रकाश नामदेव इंगळे (वय 42, व्यवसाय शेतमजुरी, रा. कालखेड ता. शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी (वय 15) ही दि. 10 मे 2026 रोजी रात्री कुटुंबासोबत घराच्या गच्चीवर झोपली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ती आढळून आली नाही.

कुटुंबीयांनी कालखेड व शेगाव परिसरात शोध घेतला, परंतु मुलगी मिळून न आल्याने अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार पोहेकॉ नंदकिशोर तिवारी यांनी फिर्याद नोंदवून तपास पोहेकॉ अतुल आगलावे यांच्याकडे सोपविण्यात आला.

दरम्यान, पो. उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी आपल्या चमूसह तांत्रिक यंत्रणेच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेगाव येथील धनगर नगर परिसरातून मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची सुरक्षितरित्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक गजानन शिंदे, पोहेकॉ नंदकिशोर तिवारी, बीट अंमलदार पोहेकॉ अतुल आगलावे तसेच महिला कॉन्स्टेबल आवारे यांनी पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment