---Advertisement---

शेगावमध्ये टिनपत्रे विकण्याच्या वादातून काकावर काठीने हल्ला; पुतण्याविरोधात गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत टिनपत्रे विकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्ध व्यक्तीवर काठीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(1), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हरी रामभाऊ डवले (वय 64) रा. दसरा मैदान, शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास ते घरी असताना त्यांचा पुतण्या संतोष देवीदास डवले रा. डोगरगाव ता. बाळापूर जि. अकोला हा दारूच्या नशेत तेथे आला. फिर्यादी यांच्या घराचे काम सुरू असल्याने घरावरील टिनपत्रे काढून खाली ठेवण्यात आली होती. त्यापैकी सहा टिनपत्रे आरोपी संतोष डवले हा भंगारवाल्याला विकत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारल्याने आरोपीने शिवीगाळ सुरू केली.

यानंतर आरोपीने खाली पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादीच्या डाव्या पायाच्या डोंगळ्यावर तसेच पाठीवर मारहाण करून जखमी केले. तसेच “मला अडवले तर तुला जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या तोंडी तक्रारी व वैद्यकीय प्रमाणपत्रावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिट पोलीस नाईक रवी इंगळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment