---Advertisement---

श्री टॉकीज चौकात मारहाण; दोन जणांविरोधात शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील श्री टॉकीज चौक परिसरात एका व्यक्तीस गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी दोन आरोपींविरोधात शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी विजय चंपतराव लोहवे (वय 42, व्यवसाय मजुरी, रा. देवळी, जि. वर्धा) हे 11 मे 2026 रोजी संध्याकाळी दर्शनासाठी शेगाव येथे आले होते. दर्शन झाल्यानंतर ते बाजारातील श्री टॉकीज चौक परिसरात गेले असता त्यांची ओळखीचे आरोपी गजानन पारधी व गोपाल मधूकर थोरात (दोघेही रा. वर्धा) यांच्याशी भेट झाली.

यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यावर व डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे. जखमीवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका श्याम आघाव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment