---Advertisement---

शेगावात देशी दारूसह एकावर कारवाई; 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) :शेगाव शहर पोलिसांनी आठवडी बाजार परिसरात प्रोव्हिशन रेड कारवाई करत देशी दारू विक्रीप्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई लहान हनुमान मंदिरासमोर करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) नुसार विनायक गजानन मोरे (वय 49, रा. धनगर नगर, शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 11.30 ते 12.05 वाजण्याच्या दरम्यान पोहेका गणेश जगदेव वाकेकर यांनी पोलीस स्टाफ व पंचांसह गुप्त माहितीच्या आधारे प्रोव्हिशन रेड केली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एमएलच्या 16 शिश्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत 640 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोहेका वासुदेव वानखडे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका श्याम आघाव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment