शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कायमी मिसिंग नं. 33/2026 नुसार इंदिरा नगर येथील धनंजय डिंगाबर सुरोशे (वय 40) हे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी सौ. पुजा धनंजय सुरोशे यांनी दि.16 मे ला तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सुरोशे हे दि. 12 मे 2026 रोजी सकाळी अंदाजे 10 वाजताच्या सुमारास “पेढ्यांच्या दुकानावर जातो” असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागत होता. संबंधित दुकानावर चौकशी केली असता ते दुकानातून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
कुटुंबीयांनी शेगाव शहर तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, त्यांचा मोबाईल चार्जिंगला लावलेला असल्याची माहिती अजय कविटकर यांनी दिली.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –
धनंजय डिंगाबर सुरोशे, वय 40 वर्ष, रा. इंदिरा नगर, शेगाव. रंग सावळा, उंची अंदाजे 5.4 फूट, बांधा मजबूत, केस काळे. अंगात चॉकलेट रंगाची टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची पॅन्ट व पायात काळ्या रंगाची चप्पल होती.
ही घटना श्री गजानन महाराज मंदिर परिसरात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास GPSI गजानन गावंडे करीत आहेत.








