---Advertisement---

शेगावमध्ये उपचारादरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 194 BNSS अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीचे नाव “योगेश आढाव” असे नमूद करण्यात आले असले तरी त्याची अधिकृत ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित इसमाचे अंदाजे वय 50 वर्षे असून पत्ता अज्ञात आहे.

दि. 18 मे 2026 रोजी काही व्यक्तींनी सदर इसमास उपचारासाठी शासकीय रुग्णालय, शेगाव येथे दाखल केले होते. त्यानंतर दि. 19 मे 2026 रोजी पहाटे 4:35 वाजताच्या सुमारास सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे उपचारादरम्यान अपघात विभागात त्याचा मृत्यू झाला.

डॉ. सोनुने यांच्या तर्फे कक्षसेवक सारंगधर सारोडे यांनी लेखी मेमो क्रमांक 6325 पोलीसांकडे सादर केला. त्यानुसार पोलिसांनी कलम 194 BNSS प्रमाणे मर्ग दाखल करून प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे यांच्याकडे सोपविला आहे.

मृत व्यक्तीच्या खिशात“योगेश आढाव” नावाचे कार्ड आढळून आल्याने रुग्णालयात त्याची नोंद त्या नावाने करण्यात आली. मात्र त्याची खरी ओळख अद्याप पटलेली नसल्याने या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क

पोलीस उपनिरीक्षक : संदीप बारिंगे
मोबाईल नंबर : 8805891164

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment