---Advertisement---

शेगाव शहर पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल; विवाहितेला मारहाण व मानसिक छळाचा आरोप!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहितेला हुंड्यासाठी छळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महविश फातिमा साकीब शाह (वय 21, व्यवसाय घरकाम) रा. टिपू सुलतान चौक, शेगाव ह.मु. यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी माहेरहून 12 लाख रुपये आणण्याची मागणी करत वारंवार वाद घालून मारहाण, शिवीगाळ तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपींमध्ये पती, सासरे, सासू, नणंद, जेठ तसेच इतर नातेवाईकांचा समावेश असून, सर्व आरोपी हे नागपूर व अमरावती येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर प्रकरणात अन्वये कलम 85, 115(2), 352, 351(2), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना 21 एप्रिल 2024 पासून 17 डिसेंबर 2025 दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, 22 मे 2026 रोजी सायंकाळी 5:53 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment