---Advertisement---

माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स, शेगांवच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी; गोल्ड व ब्राँझ मेडल पटकावले!!

---Advertisement---

शेगांव (आकाश बोरसे) : भोपाल (मध्यप्रदेश) येथे दिनांक १८ ते २१ मे दरम्यान पार पडलेल्या १९व्या सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले. डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार, तामिळनाडू आणि छत्तीसगड या बलाढ्य संघांना पराभूत करत मुलींच्या गटात तसेच मिक्स टूर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

तसेच मुलांच्या संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल मिळवले.

या यशामध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स, शेगांव येथील विद्यार्थिनी भक्ती ज्ञानेश्वर खानझोड आणि विद्यार्थी आर्यन नितेश पुंडे यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला. त्यांच्या या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर दादा पाटील, मुख्याध्यापिका मा. मृणालीताई पाटील तसेच शाळेचे क्रीडा प्रमुख श्री विश्वजीत ठाकूर सर यांनी विद्यार्थ्यांचे आणि महाराष्ट्र संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment