शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्राफिक ड्युटी दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कारवाई केली.
पोलीस माहितीनुसार, आरोपी जमील खान बुढण खान (वय 30, रा. इदगाह प्लॉट, शेगाव) हा टाटा ऐल्ट्रा वाहन क्रमांक MH 28 BB 5295 मध्ये बैल जनावरे दाटीवाटीने कोंबून, आखूड दोरीने बांधून भरधाव व निष्काळजीपणे वाहतूक करताना आढळून आला.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश वानखडे यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे अंतर्गत कलम 281 BNS सह प्राणी निर्दयतेने वागविणे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई 23 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली. पुढील तपास जी.पीएसआय गावंडे साहेब करीत आहेत.







