शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीसांनी अमली पदार्थ सेवन प्रकरणात मोठी कारवाई करत दोन आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शेगाव येथील आठवडी बाजार परिसरात करण्यात आली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 8(c), 27, 29 NDPS Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोहेकॉ. संतोष शंकर गवई यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- अवधुत शामराव वाव्हुरवाघ (वय 42 वर्ष)
व्यवसाय – शेतमजुरी
रा. जवळा पळसखेड, ता. शेगाव - शेख अब्बास शेख जिलाणी (वय 35 वर्ष)
व्यवसाय – मजुरी
रा. खळवाडी परिसर, शेगाव
दि. 24 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 7.45 वाजण्याच्या दरम्यान एम. के. कंपनी दुकानासमोर, आठवडी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही इसम गांजा या अमली पदार्थाचे सेवन करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपींकडून चिलममधील गांज्याची राख, चिलममधील छोटा खडा तसेच चिलमच्या मागे असलेला पांढऱ्या रंगाचा छोटा कपडा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाईनंतर दोन्ही आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI कुणाल जाधव हे करत आहेत.








