---Advertisement---

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वरवट येथे वृक्षारोपण; दिपू वडोदे यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा!!

---Advertisement---

वरवट,(आकाश बोरसे) : दि. ६ जून -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रदीप उर्फ दिपू वडोदे यांच्या वाढदिवसानिमित्त वरवट येथील बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. “वृक्षरोपण हीच भावी पिढीसाठीची खरी गुंतवणूक” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. गणेश दातीर, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिपूभाऊ वडोदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ मागे, सुभाषभाऊ हागे, पवनजी अस्वार, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोपालभाऊ बंड, गणेश साबळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, संजय बोरसे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्षारोपणामुळे पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते तसेच भविष्यातील पिढीसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण होण्यास हातभार लागतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

“चला… एक वृक्ष लावूया, पर्यावरण जपूया आणि हरित भविष्यासाठी आपले योगदान देऊया,” असा संदेश यावेळी देण्यात आला.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment