---Advertisement---

साबीर खान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती!!

---Advertisement---

संग्रामपूर | (आकाश बोरसे) : दि.७ जून-तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी तथा नॅशनल डायनामा दुरुस्ती सेंटरचे संचालक साबीर खान साहेब खान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ॲड. अब्दुल करिम खान यांनी नियुक्तीपत्राद्वारे जाहीर केली. नियुक्तीपत्रात पक्ष बळकटीसाठी कार्य करत पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच अल्पसंख्यांक विकास आणि पक्ष संघटन मजबुतीसाठी तन, मन आणि धनाने कार्य कराल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. प्रसन्नजीत पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ॲड. अब्दुल करिम खान, डॉ. शेख शोहेब तसेच एजाज देशमुख उपस्थित होते.

साबीर खान पठाण यांच्या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment