---Advertisement---

फिफा विश्वचषक २०२६ निमित्त बुलढाण्यात फुटबॉलचा महाउत्सव; विशेष कार्यक्रम उत्साहात!

---Advertisement---

बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : २३ व्या FIFA World Cup 2026 निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि बुलढाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “हार्दिक शुभेच्छा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिजामाता क्रीडा संकुलातील जिल्हा क्रीडा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र येथे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.“मैदान गाजणार, इतिहास रचला जाणार, गोल होणारच! खेळ भावना जिंकण्याचा–उत्सव फुटबॉलचा!” या घोषवाक्याने खेळाडूंनी विश्वचषकाला शुभेच्छा देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे होत्या. यावेळी बुलढाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. ठाकरे, सचिव एन. आर. वानखेडे, तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर तसेच सहकार विद्या मंदिरचे क्रीडा विभाग प्रमुख सय्यद आबीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांचा फिफा विश्वचषक २०२६ ची विशेष फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी स्पर्धेत सहभागी सर्व संघ आणि खेळाडूंना शुभेच्छा देतानाच बुलढाणा जिल्ह्यातील युवा फुटबॉल खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात क्रीडा शिक्षक व एनआयएस हँडबॉल प्रशिक्षक मनोज श्रीवास यांनी FIFA World Cup 2026 विषयी माहिती दिली. यंदाचा विश्वचषक ११ जूनपासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांत होत असून प्रथमच ४८ संघ स्पर्धेत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय वंशाचे चार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला जिल्ह्यातील १३ व १५ वर्षे वयोगटातील फुटबॉल खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात फुटबॉल खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा आणि युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश बाफना, मनोज श्रीवास, रमिज चौधरी, राहुल ओशालकर, उज्ज्वला लांडगे आणि डॉ. जीवन मोहोड यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. जीवन मोहोड यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज श्रीवास यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment