---Advertisement---

शेगावात वरली मटका जुगारावर पोलिसांची दुहेरी कारवाई; दोन आरोपींवर गुन्हे दाखल!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी अवैध वरली मटका जुगाराविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई दि. 13 जून 2026 रोजी MSEB ऑफिसजवळ रोडच्या बाजूला करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम सार्वजनिक ठिकाणी बसून लोकांकडून पैसे घेऊन वरली मटका अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या देत जुगार खेळत व खेळवीत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला.

पहिल्या कारवाईत आरोपी लक्ष्मण आत्माराम शेगोकार (रा. श्री टॉकीज चौक, शेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 750 रुपये नगदी, वरली मटका चिठ्ठ्या व बिग डॉट पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कायम जातीय अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या कारवाईत आरोपी लाला कन्हैया लाल कछवा (रा. व्यंकटेश नगर ताडी, शेगाव) याला पकडण्यात आले. आरोपीकडून 850 रुपये नगदी, वरली मटका अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या व पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कायम जातीय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस देऊन सोडण्यात आले असून पुढील तपास HC गजानन प्रल्हाद वाघमारे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment