---Advertisement---

शेगाव आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन; आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार निदर्शने!!

---Advertisement---

शेगाव, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 15 जून 2026-शेगाव आगारामध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शासन व प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले.

या आंदोलनात महेश बुरुंगले, अमोल राठोड, भास्कर गीते, दीपक चिकटे, नरेंद्र खंडेराव, अमोल गावंडे, राजेश बिटोळे, मारोती नागे, प्रफुल चव्हाण, जमीर देशमुख, वैभव पाठक, सुगधनंद इंगळे, मंगेश उईके, श्रीकृष्ण बुटे, शेषराव निंबाळकर, वसीम राजा, सुभाष बहाकर, राजाराम माळी, संतोष दिवनाले, शेख रियाजुद्दीन, प्रकाश परीहार, प्रमोद बुंदे, अमोल पूर्णये यांच्यासह महिला कर्मचारी शितल लाखे, दर्शना भावरकर, सत्यभामा सदार, रूपाली ताथोड व इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कर्मचाऱ्यांनी प्रलंबित आर्थिक मागण्या तात्काळ मंजूर करून न्याय द्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला. आंदोलनामुळे आगार परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment