स्वर्गीय शिवनारायणजी राठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्यसेवेचा उपक्रम!!
पळशी झाशी (आकाश बोरसे) : 16 जून 2026 – पळशी झाशी येथे स्वर्गीय शिवनारायणजी हस्तीमलजी राठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच श्रीमती विमलादेवी राठी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय व धन्वंतरी आरोग्यधाम आयुर्वेदिक हॉस्पिटल, गायगाव बु. (शेगाव) यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री सत्यनारायण भगवान मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या शिबिरात जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिपकजी लद्दड यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले. शिबिरात सुमारे 120 रुग्णांनी सहभाग घेत लाभ मिळविला. रक्त तपासणी, ईसीजी तसेच आवश्यक औषधोपचार मोफत करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मयूर सावळे (जिल्हा वैद्यकीय अधिकारी, आयुष्मान भारत योजना), डॉ. रवी भोपळे (जिल्हा समन्वयक), डॉ. कुणाल सोलंकी (जिल्हा प्रमुख) यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रणाम खर्चे, डॉ. स्नेहल देशपांडे, डॉ. महेश नारखेडे, डॉ. विवेक ठाकरे, श्री राहुल गवई, श्री आशिष उगलकर, श्री शाम वाघ व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमादरम्यान ह.भ.प. सौ. रेणुका ताई जाधव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांचे उत्कृष्ट नियोजन लाभले. तसेच श्री सत्यनारायण मंदिराचे अध्यक्ष श्री विष्णू राठी, श्री रमेशचंद्रजी राठी, श्री रामभाऊ पाटील जाणे (गाडेगाव), श्री अतुल भाऊ मारोडे, श्री प्रकाश शेठ भुतडा (जामोद), श्री शंकर भाऊ कुकळकार, श्री विष्णू भाऊ गावंडे, श्री राजू पवार (जिल्हा परिषद सदस्य), श्री गणेश प्र. मारोडे, श्रीकृष्ण हातेकर, चि. प्रफुल थुवोकार यांनी मोलाचे सहकार्य केले.
उपस्थित नागरिकांनी शिबिराचे कौतुक करत अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)









