---Advertisement---

शेगाव बसस्थानकावर प्रवासी महिलेची बॅग चोरी; सुमारे 91 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास!!

---Advertisement---

शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव बसस्थानकावर बस प्रवासादरम्यान एका महिलेची दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजा शंशाक जगताप (वय 30), व्यवसाय ब्युटी पार्लर, रा. पुंडलिक नगर, चिखली या 17 जून रोजी दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास शेगाव बसस्थानकावर बसमध्ये प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांची बॅग संशयित महिला दीपाली अक्षय गवई, रा. करवंड, ता. चिखली आणि तिच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चोरीस गेलेल्या बॅगेमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख 4 हजार रुपये, इमिटेशन ज्वेलरी, मेकअप किट, बँगल बॉक्स, मोबाइल चार्जर, हेडफोन आदी साहित्य होते. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 91 हजार 800 रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 388/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शाम अघाव करीत आहेत.

शेगाव बसस्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बसस्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment