---Advertisement---

शेगाव आठवडी बाजारात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत आठवडी बाजार परिसरातून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत देशी दारूच्या शिश्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी सायंकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान शेगाव येथील आठवडी बाजार परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान सौ. विमल समाधान किरोते (वय 65 वर्षे, रा. धनगर फैल, शेगाव) यांच्या ताब्यातून अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेली देशी दारू जप्त करण्यात आली.

आरोपीच्या ताब्यातील थैलीमध्ये टॅगो पंच कंपनीच्या 90 एम.एल.च्या 15 प्लास्टिक शिश्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 600 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शंकर गवई यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment