---Advertisement---

उसनवारीच्या पैशांच्या वादातून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव, दि. 23 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून एका विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पवन रामदास सोळंके (वय 26, रा. मोरगाव सादीजन, ता. बाळापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर मानसिंग राठोड व जया ऊर्फ गोकर्णा भास्कर राठोड (रा. विश्वनाथ नगर, शेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 108 व 3(5) अंतर्गत अपराध क्रमांक 395/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 21 जून 2026 रोजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास विश्वनाथ नगर, शेगाव येथे ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. फिर्यादीची मयत बहीण शितल रामेश्वर राठोड हिच्या आई-वडिलांनी आरोपींना उसनवारीने तीन लाख रुपये दिले होते. मुलीला त्रास होऊ नये तसेच जावयासोबतचे संबंध चांगले राहावेत या हेतूने ही रक्कम देण्यात आली होती.

यापैकी आरोपींनी एक लाख 97 हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रक्कम देण्यास आरोपी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. शितल राठोड ही पैसे मागण्यासाठी आरोपींकडे गेली असता तिला वारंवार नकार देण्यात येत होता. त्यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच, आरोपी क्रमांक 1 व 2 यांनीच शितल राठोड हिला आत्महत्येस प्रवृत्त केले असून तिच्या मृत्यूस तेच कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी दि. 21 जून 2026 रोजी रात्री 10.07 वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment