मेहकर (युवा क्रांती वृत्तसेवा) : खासदार प्रतापराव जाधव तथा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या हस्ते मेहकर येथे पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान युवा कार्यकर्ते शुभम ढगे यांची शेगाव शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी स्वागत करत अभिनंदन केले.
या कार्यक्रमास अमोल अंधारे, उमेश पाटील, रामभाऊ थारकर, अतुल ठोंबरे यांच्यासह शुभम ढगे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या पक्षप्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणाला नवचैतन्य प्राप्त झाले असून शुभम ढगे यांच्या शहराध्यक्षपदी निवडीमुळे शेगाव शहरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.









