---Advertisement---

एमईसीबी चौकात तरुणाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव, दि. 26 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरातील एमईसीबी चौक परिसरात शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव संतोष बोरचाटे (वय 22, रा. शिवाजीनगर, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदित्य दाते, गौरव सूर्यवंशी आणि योगेश पाटील (रा. विवेक नगर, शेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(1), 115(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 24 जून रोजी सायंकाळी आरोपी क्रमांक 1 यास “तू आम्हाला शिवीगाळ का केली?” असा जाब विचारला असता त्याने फिर्यादीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जोराने धक्का दिल्याने फिर्यादी रस्त्यालगतच्या नालीत पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

यावेळी फिर्यादीचा चुलत भाऊ अथर्व विलास बोरचाटे (वय 16) यालाही आरोपीने हातातील कड्याने उजव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच तिन्ही आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या जबाब व वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ सुनील सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment