---Advertisement---

शेगावात घरगुती वादातून वडिलांवर लोखंडी वस्तूने हल्ला; मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील गायत्री नगर परिसरात घरात राहण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून वृद्ध वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबुराव जानोजी घ्यारे (वय 65, व्यवसाय – शेती, मूळ रा. बहादुरपुरा, ता. बाळापूर, जि. अकोला, सध्या रा. गायत्री नगर, शेगाव) यांच्या तक्रारीवरून आरोपी राजेश बाबुराव घ्यारे व प्रतीभा राजेश घ्यारे (दोघे रा. गायत्री नगर, शेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, 29 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता घरात राहण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी आरोपी राजेश घ्यारे याने फिर्यादीस शिवीगाळ करून “येथून निघून जा, मला या घरात राहायचे आहे,” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी वस्तूने उजव्या डोळ्याच्या वर वार केल्याने फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर पाठीवर व हातावरही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

याचवेळी आरोपी प्रतीभा राजेश घ्यारे हिने फिर्यादी यांच्या पत्नी राजकन्या यांचे केस धरून त्यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

जखमीच्या जबाब व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास HC सुनील सुसर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment