---Advertisement---

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’चे धडे; शेगाव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) :१ जुलै – नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेगाव येथील मौलाना अबुल कलाम आझाद नगरपरिषद उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेला प्राधान्य देत शेगाव शहर पोलिसांच्या वतीने ‘गुड टच-बॅड टच’ विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण अशा विविध उपक्रमांसह शेगावातील या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शेगाव शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप बारिंगे आणि महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शबाना पटेल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत ‘गुड टच-बॅड टच’, पोक्सो कायद्यातील तरतुदी, लैंगिक शोषणापासून संरक्षण, तंबाखू, दारू व अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच सुरक्षित वाहतुकीबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास नगरसेवक नदीम पटेल, पत्रकार फहीम देशमुख, अब्दुल समद सर, मो. इमरान अहमद देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इर्शाद खान, मुबीनोद्दीन काझी, रवी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका निकहत सालेहा मोहम्मद जमीर शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. नवीन पुस्तके व गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान अली सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अब्दुल समद सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे देणाऱ्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment