शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव ग्रामीण पोलिसांनी टाकळी धारव येथे छापा टाकून अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्या व इतर साहित्य असा एकूण 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास टाकळी धारव येथे छापा टाकण्यात आला. यावेळी राजकुमार किशोर ब्राम्हणे (वय 34, रा. टाकळी धारव, ता. शेगाव, जि. बुलढाणा) याच्या ताब्यात परवान्याशिवाय अवैधरित्या देशी दारूचा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान ‘टँगो पंच’ लेबल असलेल्या 90 मिलीच्या 18 देशी दारूच्या बाटल्या (किंमत 900 रुपये) तसेच एक नायलॉनची थैली (किंमत 10 रुपये) असा एकूण 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईतील फिर्यादी सफौ. गजानन हरी पाटील असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल बरींगे करीत आहेत.









