शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील आडसुळ येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्याने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात संगीता श्रीकृष्ण मोडकर (वय 37, रा. आडसुळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 जुलै रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास राजू दिनकर कोल्हे, भारत मनोहर कोल्हे व शिवाजी मनोहर कोल्हे यांनी त्यांच्या पतीला घराबाहेर बोलावून रस्त्यावर मुरूम का टाकला, या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी काठीने मारहाण करत असताना फिर्यादी मध्ये पडल्याने त्यांच्या कपाळावर डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. तसेच पती व सासूला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी BNS कलम 118(1), 115, 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात जानाबाई मनोहर कोल्हे (वय 40, रा. आडसुळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीकृष्ण प्रल्हाद मोडकर, संगीता श्रीकृष्ण मोडकर व गीताबाई प्रल्हाद मोडकर यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी BNS कलम 296, 115, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज माने करीत आहेत.









