---Advertisement---

शेगावात कौटुंबिक वादातून मारहाण; पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील मार्कंड नगर परिसरात कौटुंबिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सफाई कामगाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून पत्नीसह दोन जणांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण अर्जुन सारवान (वय 41, व्यवसाय – सफाई कामगार, रा. मार्कंड नगर, शेगाव) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कलम 118(1), 352, 351(2), 115(2) व 3(5) BNS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपी चंद्रभागा लक्ष्मण सारवान (वय 35, रा. मार्कंड नगर, शेगाव) आणि माधव श्रीराम वानखडे (वय 38, रा. खळवाडी, शेगाव) आहेत.

फिर्यादीनुसार, 3 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता फिर्यादी घरी गेले असता आरोपी माधव वानखडे घरात बसलेले दिसले. याबाबत पत्नीला विचारणा केल्यानंतर वाद झाला. त्यावेळी आरोपी चंद्रभागा हिने लाकडी बेलनाने फिर्यादीच्या पाठीवर, उजव्या हातावर व शरीराच्या इतर भागांवर मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे.

तसेच आरोपी माधव वानखडे याने शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी गळा दाबल्यामुळे फिर्यादीच्या मानेवर व्रण उमटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दोन्ही आरोपींनी पुन्हा बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीची तोंडी तक्रार व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment