---Advertisement---

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांसाठी नवी संधी!!

---Advertisement---

बुलढाणा |(युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्य शासनाने शेतकऱ्यांना थकीत कृषी कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सुरू केली आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची संधी मिळणार असून, भविष्यात नियमित कर्जव्यवहारासाठीही मदत होणार आहे.

शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्याने अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभावातील चढ-उतार यांसारख्या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जाची वेळेत परतफेड करता येत नाही. त्यामुळे वाढणारा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने ही योजना राबविली आहे.

योजनेअंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. अल्पमुदतीची पीक कर्जे तसेच काही पुनर्गठित कृषी कर्जांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र लाभासाठी शासनाच्या सर्व अटी व निकषांची पूर्तता आवश्यक आहे.

लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज खाते, आधार क्रमांक, बँक खाते व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अचूक माहितीमुळे पडताळणी प्रक्रिया जलद व सुलभ होऊन लाभ वेळेत मिळण्यास मदत होते.

योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी डिजिटल पडताळणी, बँकांकडून अचूक माहिती संकलन आणि विविध स्तरांवरील तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि संबंधित शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची माहिती नियमित तपासून आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत संबंधित बँकेकडे सादर करावी. चुकीची किंवा अपूर्ण माहितीमुळे लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो.

ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेती व्यवसायाला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

– स्रोत : जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment