---Advertisement---

लहुजी नगरातील 192 झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नगर परिषदेला स्पष्ट निर्देश; त्वरित कार्यवाहीची मागणी!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 09 जुलै 2026 –शेगाव येथील लहुजी नगर परिसरातील 192 झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण प्रशासकीय हालचाल झाली आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे (भा.प्र.से.) यांनी नगर परिषद, शेगावच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र क्रमांक 1481/2026, दि. 23 जून 2026 रोजी संबंधित प्रकरणात नियमानुसार तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ही कार्यवाही सौ. सुनीता वाघडे व इतरांनी 1 जून 2026 रोजी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, हा विषय नगर परिषद, शेगावच्या कार्यक्षेत्रातील असल्याने संबंधित प्राधिकरणाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून अहवाल सादर करावा.

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, 4 मार्च 2025 रोजी लहुजी नगरातील 192 झोपड्यांचे पाडकाम करण्यात आले होते. मात्र दीड वर्ष उलटूनही अनेक कुटुंबांना पर्यायी जागा किंवा कायमस्वरूपी पुनर्वसन मिळालेले नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.

संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. तसेच नगर परिषदेकडून त्वरित कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या जनहित याचिकेत (PIL) जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या

  • लहुजी नगरातील सर्व 192 झोपडीधारकांचे तात्काळ सर्वेक्षण पूर्ण करावे.
  • सर्व पात्र कुटुंबांना पर्यायी जागा व कायमस्वरूपी पुनर्वसन द्यावे.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी.
  • पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत प्रभावित कुटुंबांना आवश्यक संरक्षण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

संपर्क:
गजानन ओंकारराव तायडे
विदर्भ अध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल
लहुजी नगर पुनर्वसन संघर्ष समिती, शेगाव, जि. बुलढाणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment