---Advertisement---

मलकापूर रेल्वे स्थानकावर आत्महत्येचा प्रयत्न; GRP, RPF व नागरिकांच्या तत्परतेने महिलेचे प्राण वाचले!!

---Advertisement---

मलकापूर |(डी ललित) : मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका 48 वर्षीय महिलेचे GRP, RPF तसेच उपस्थित कुली, ऑटोचालक आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले. या घटनेमुळे रेल्वे पोलीस व नागरिकांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.50 वाजता मलकापूर रेल्वे स्थानकावर एक महिला रेल्वेगाडीसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी उपस्थित कुली, ऑटोचालक आणि प्रवाशांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिला सुरक्षित बाजूला घेतले.

घटनेची माहिती मिळताच GRP चे GPSI तायडे, पोलीस हवालदार मोहेकर तसेच RPF कर्मचारी इंगळे आणि शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची समजूत काढली. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपले नाव मंगला अशोक वानखडे (वय 48, रा. नांदुरा) असे सांगितले.

त्यानंतर रेल्वे पोलिसांनी महिलेच्या आईशी दूरध्वनीवर संपर्क साधला. वयोमानामुळे स्वतः येणे शक्य नसल्याने मुलीला सुरक्षित घरी पोहोचविण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार RPF च्या शासकीय वाहनातून पोलीस हवालदार खोडके, पोलीस हवालदार मोहेकर आणि RPF कर्मचारी इंगळे यांनी संबंधित महिलेला नांदुरा येथे तिच्या आईच्या घरी सुरक्षित पोहोचवून ताबा पावतीनिशी तिच्या आईच्या स्वाधीन केले.

या संपूर्ण घटनेत नागरिक आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी दाखविलेल्या संवेदनशीलता, सतर्कता आणि तातडीच्या प्रतिसादामुळे एका महिलेचे प्राण वाचले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment