---Advertisement---

राजंदा हादरले! १४ वर्षीय भक्ती उर्फ गौरी बेपत्ता, नागरिकांना सहकार्याचे आवाहन!

---Advertisement---

बार्शीटाकळी | (युवा क्रांती वृत्तसेववा) : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा येथील भक्ती उर्फ गौरी दत्तात्रय महल्ले (वय १४ वर्षे ७ महिने) ही अल्पवयीन मुलगी आज पहाटेपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. ती ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ५ वाजता घरातून बाहेर पडली असून त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने बार्शीटाकळी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

ओळख

  • नाव: भक्ती उर्फ गौरी दत्तात्रय महल्ले
  • वय: १४ वर्षे ७ महिने
  • राहणार: राजंदा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
  • विशेष खूण: पाठीवर निळ्या रंगाची स्कूल बॅग आणि पायात गुलाबी रंगाची चप्पल.

माहिती असल्यास त्वरित संपर्क साधा

  • प्रवीण धुमाळ (पोलीस निरीक्षक): 9420246968
  • अमित सुगंधी (पोहेकॉ, राजंदा बिट): 8766567054
  • मनीष घुगे (पोलीस कॉन्स्टेबल): 7887335334
  • अथवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

नागरिकांना आवाहन: संबंधित मुलगी कुठेही दिसल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास कृपया तातडीने पोलिसांना कळवावे. तुमच्या एका फोनमुळे एका कुटुंबाला त्यांची मुलगी सुखरूप परत मिळू शकते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment