बार्शीटाकळी | (युवा क्रांती वृत्तसेववा) : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा येथील भक्ती उर्फ गौरी दत्तात्रय महल्ले (वय १४ वर्षे ७ महिने) ही अल्पवयीन मुलगी आज पहाटेपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. ती ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ५ वाजता घरातून बाहेर पडली असून त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शोध घेतला; मात्र ती आढळून न आल्याने बार्शीटाकळी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
ओळख
- नाव: भक्ती उर्फ गौरी दत्तात्रय महल्ले
- वय: १४ वर्षे ७ महिने
- राहणार: राजंदा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
- विशेष खूण: पाठीवर निळ्या रंगाची स्कूल बॅग आणि पायात गुलाबी रंगाची चप्पल.
माहिती असल्यास त्वरित संपर्क साधा
- प्रवीण धुमाळ (पोलीस निरीक्षक): 9420246968
- अमित सुगंधी (पोहेकॉ, राजंदा बिट): 8766567054
- मनीष घुगे (पोलीस कॉन्स्टेबल): 7887335334
- अथवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
नागरिकांना आवाहन: संबंधित मुलगी कुठेही दिसल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास कृपया तातडीने पोलिसांना कळवावे. तुमच्या एका फोनमुळे एका कुटुंबाला त्यांची मुलगी सुखरूप परत मिळू शकते.









