---Advertisement---

शेगावातील लालबाबा देवी मंदिर परिसरातून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांत मिसिंगची नोंद!!

---Advertisement---

शेगाव,(डी ललित) : दि. 19 जुलै –बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लांजुळ येथील 23 वर्षीय अंकिता रमेश शेलकर ही तरुणी शेगावातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम मिसिंग क्रमांक 52/2026 नोंद करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता रमेश शेलकर ही मागील सहा दिवसांपासून नातेवाईकांकडे शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी आली होती. 17 जुलै रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता तिला लालबाबा देवी मंदिर परिसरातून ऑटोमध्ये बसवून लांजुळ येथे रवाना करण्यात आले. मात्र ती घरी पोहोचली नाही.

यानंतर कुटुंबीयांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळले. नातेवाईकांनी शेगाव शहर तसेच मंदिर परिसरात शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. अखेर तिची आई संगीता रमेश शेलकर यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बेपत्ता अंकिता हिचा रंग गोरा, उंची सुमारे 5 फूट 3 इंच, बांधा मजबूत, केस लांब असून ती निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली होती. तिच्याकडे कॉलेज बॅग आणि मोटोरोला कंपनीचा मोबाईल होता.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत. संबंधित तरुणीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment