---Advertisement---

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपूरमध्ये भव्य रक्तदान शिबिर; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग!!

---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, संग्रामपूर मंडळाच्या वतीने वरवट बकाल येथील शिक्षण सोसायटी परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात संग्रामपूर मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चाचे सदस्य तसेच अनेक हितचिंतकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

उपस्थितांनी रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असल्याची भावना व्यक्त करत हा उपक्रम सेवा आणि समाजहिताचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संयोजकांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष भाऊराव पाटील, उपाध्यक्ष गोपाल बंड, माजी तालुकाध्यक्ष लोकेश राठी, खरेदी-विक्री संचालक पांडूभाऊ उभे, गणेश साबळे, राजूभाऊ मुयेंडे, संतोष चिकटे, सुभाष हागे, राहुल शिरसोले, संजय बोरसे, राजू देशमुख, पांडुरंग हागे, पवन अस्वाल, गजानन भुते, गणेश भुते, संजय उमाळे, विजू लिप्ते, प्रदीप भुतडा, प्रकाश गोतमारे, रमेश खोकले, प्रविण डोरे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment