शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 24 जुलै-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांच्या “फोडा आणि राज्य करा” या धोरणाला आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांनी ठामपणे विरोध केला. त्यांनी भारतीय समाजाला वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, असे प्रतिपादन नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सल्लागार पवन शर्मा यांनी केले.
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व टिळकप्रेमींच्या वतीने शेगाव येथील लोकमान्य टिळक चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना पवन शर्मा म्हणाले की, भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रभावना टिकवण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या विचारांचे अनुसरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि जनजागृतीच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरपालिका भाजप गटनेते शरदशेठ अग्रवाल, ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नंदुभाऊ कुळकर्णी, तालुका अध्यक्ष विजय जगधन, जिल्हा महासचिव भूषण महाजन, दत्ता भोंडेकर, अमर खराटे, विवेक घोडेराव, मोनू देशपांडे, राजेश शितूत, भरतसेठ जोशी, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र…, तालुका पत्रकार संघाचे सल्लागार राजुभाऊ व्यास, चेतन व्यास, डॉ. शशिकांत जोशी, ओमप्रकाश व्यास, प्रकाश कळस्कर, निशांत ठाकूर, जगदीश नकरनौलिया, आशिष मेटे यांच्यासह मोठ्या संख्येने टिळकप्रेमी उपस्थित होते.









