---Advertisement---

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीला शेगावात भक्तांचा महापूर; श्रींचे मंदिर रात्रभर खुले!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) :२४ जुलै-आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शुक्रवार, 24 जुलैच्या रात्री श्रींचे मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

शनिवार, 25 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मराठवाडा, खान्देश, जळगाव आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून हजारो भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी शेगावात येणार आहेत. यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांत काकडा आरती, भजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा तसेच रात्री 8 ते 10 या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार आहे.

भाविकांना श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद यांची व्यवस्था करण्यात आली असून संस्थानच्या भक्त निवासात नियमानुसार निवास सुविधाही उपलब्ध आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांच्या सोयीसाठी सेवेकरी सज्ज असून उत्सव काळात सर्वतोपरी सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे.

Ashadhi Ekadashi2026

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment