---Advertisement---

Shegaon Railway Station परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन!!

---Advertisement---

शेगाव, (डी ललित): दि. 25 जुलै -शेगाव रेल्वे स्टेशनसमोरील प्रवेशद्वाराजवळ एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला होता. उपस्थित नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी सईबाई .मोटे.सामान्य रुग्णालय, शेगाव येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वर्ग क्रमांक 47/2026, कलम 194 बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आली असून, मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मागितले आहे.

मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :टे

  • उंची : अंदाजे 5 फूट
  • वय : अंदाजे 45 वर्षे
  • रंग : गोरा
  • दाढी : वाढलेली
  • उजव्या हातावर “हेमंत चौथे” अथवा “हेमंत चौके” असे गोंदलेले
  • अंगात : लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट

या वर्णनाशी मिळती-जुळती व्यक्ती कोणाच्या परिचयातील असल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती असल्यास, नागरिकांनी तात्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तसेच, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संबंधिताचा फोटो वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येत असून, ही बातमी व फोटो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment