---Advertisement---

Shegaon Crime: आठवडी बाजारात गांजा सेवन प्रकरण; दोघांविरुद्ध NDPS Act अंतर्गत गुन्हा!!

---Advertisement---

शेगाव |(डी ललित) : शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात गांजा सेवन केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत गांजा सेवनासाठी वापरलेली चिलम व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

शेगाव शहर पोलीस ठाण्यात NDPS Act कलम 8(c), 27 व 29 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11.25 वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजारातील भाजी मार्केट परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख जाफर शेख इकरामोद्दीन (वय 30, रा. इदगाह प्लॉट, शेगाव) आणि अवधूत श्यामराव वाहुरवाध (वय 37, रा. जवळा पळसखेड, सध्या इंदिरा नगर, शेगाव) यांच्या ताब्यातून गांजा सेवनासाठी वापरलेली चिलम, चिलममधील गांज्याची राख, छोटा खडा, पांढरा कपडा तसेच माचीस असा सुमारे ₹50 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment