---Advertisement---

BJP Mahila मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत शेगावला मानाचे स्थान!!

---Advertisement---

सौ. कल्पना मसने यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत शेगावला मानाचे स्थान मिळाले असून, सौ. कल्पना मसने यांची महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शेगावसह बुलडाणा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, महिला संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

सौ. कल्पना मसने या गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चामध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. विविध सामाजिक, संघटनात्मक आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत प्रदेश नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीनंतर भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. शेगाव शहरासाठी ही नियुक्ती अभिमानाची बाब मानली जात असून, जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातही या निवडीची सकारात्मक चर्चा सुरू आहे.

सौ. कल्पना मसने यांनी प्रदेश नेतृत्वाचे आभार मानत, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा तसेच राज्यभर महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment